वार्षिक यात्रोत्सव कार्यक्रम
दरवर्षी श्री क्षेत्र पार्वतीपूर, पार येथे श्रीरामवरदायिनी मातेचा वार्षिक यात्रोत्सव मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात साजरा केला जातो. धार्मिक विधी, अभिषेक, आरती, महाप्रसाद, पालखी मिरवणूक, भजन, कीर्तन तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे हा उत्सव भक्तांसाठी विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो.
यावर्षी आदिशक्ती श्रीरामवरदायिनी शारदीय नवरात्रोत्सव २०२६ हा दि. ११ ऑक्टोबर २०२६ ते २० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे.
आदिशक्ती श्रीरामवरदायिनी शारदीय नवरात्रोत्सव २०२६
स्थळ: श्री क्षेत्र पार्वतीपूर, पार, ता. महाबळेश्वर, जि. सातारा
कालावधी: आश्विन शु. १ ते १०
दि. ११/१०/२०२६ ते २०/१०/२०२६ उत्सव
नवरात्रोत्सवातील प्रमुख कार्यक्रम
धार्मिक कार्यक्रम
घटस्थापना व श्रींची आरती
श्रीरामवरदायिनी मातेचा अभिषेक
सर्व देवदेवतांचा अभिषेक
महादेवाला अभिषेक
होम व पूर्णाहुती
हळदी-कुंकू व कुंकुमार्चन
दररोज महाप्रसाद
भक्ती व सांस्कृतिक कार्यक्रम
संगीत भजन
कीर्तन
गोंधळ
पालखी मिरवणूक
शमीपूजन व सीमोल्लंघन
नवरात्रोत्सवातील नित्य कार्यक्रम
प्रतिपदा – रविवार | दि. ११/१०/२०२६
- सकाळी ६ ते ९ वा. – श्री जलाभिषेक
- सकाळी १० ते ११ वा. – घटस्थापना व आरती
- दुपारी २ ते ४ वा. – महाप्रसाद
- रात्री ९.३० वा. – आरती
- रात्री १० वा. – ह.भ.प. वी.ए. महाराज अंबिकाभजनी मंडळ, सिद्धनाथ वाडी, वाई यांचे भजन
द्वितीया – सोमवार | दि. १२/१०/२०२६
- सकाळी ११ वा. – श्रींची आरती
- दुपारी १२ ते ३ वा. – महाप्रसाद
- रात्री ९.३० वा. – आरती
- रात्री १० वा. – संगीत भजन
तृतीया – मंगळवार | दि. १३/१०/२०२६
- सकाळी ११ वा. – श्रींची आरती
- दुपारी १२ ते ३ वा. – महाप्रसाद
- रात्री ९.३० वा. – आरती
- रात्री १० वा. – संगीत भजन
चतुर्थी – बुधवार | दि. १४/१०/२०२६
- सकाळी ११ वा. – श्रींची आरती
- दुपारी १२ ते ३ वा. – महाप्रसाद
- रात्री ९.३० वा. – आरती
- रात्री १० वा. – संगीत भजन
पंचमी – गुरुवार | दि. १५/१०/२०२६
- सकाळी ११ वा. – श्रींची आरती
- दुपारी १२ ते ३ वा. – महाप्रसाद
- रात्री ९.३० वा. – आरती
- रात्री १० वा. – कुंकुमार्चन कार्यक्रम
षष्ठी – शुक्रवार | दि. १६/१०/२०२६
- सकाळी ९ वा. – महादेवाला अभिषेक
- सकाळी ११ वा. – श्रींची आरती
- दुपारी १२ ते ३ वा. – महाप्रसाद
- रात्री ९.३० वा. – आरती
- रात्री १० वा. – संगीत भजन
सप्तमी – शनिवार | दि. १७/१०/२०२६
- सकाळी ११ वा. – श्रींची आरती
- दुपारी १२ ते ३ वा. – महाप्रसाद
- रात्री ९.३० वा. – आरती
- रात्री १० वा. – ह.भ.प. विवेक महाराज कोंढे (कोंढूर), ता. मुळशी यांचे कीर्तन
अष्टमी – रविवार | दि. १८/१०/२०२६
- सकाळी ८ ते ११ वा. – सर्व देवदेवतांना अभिषेक
- सकाळी ११ वा. – श्रींची आरती
- दुपारी १२ वा. – गोंधळ
- दुपारी १.३० ते ३ वा. – महाप्रसाद
- दुपारी २ वा. – हळदी-कुंकू
- रात्री ९.३० वा. – श्रींची आरती
- रात्री १० वा. – संगीत भजन
नवमी – सोमवार | दि. १९/१०/२०२६
- सकाळी ११.३० वा. – घट हलविणे व श्रींची आरती
- होमाची पूर्णाहुती
- दुपारी १२ ते ३ वा. – महाप्रसाद
- रात्री ९.३० वा. – आरती
- रात्री १० वा. – भजन
दशमी – मंगळवार | दि. २०/१०/२०२६
- सकाळी ११ वा. – श्रींची आरती
- दुपारी १२ ते ३ वा. – महाप्रसाद
- सायंकाळी ४ वा. – श्रींची आरती
- सायंकाळी ५ वा. – सिमेवर पालखी मिरवणूक
- सायंकाळी ६ वा. – सिमेवर शमीपूजन व सीमोल्लंघन
- रात्री ७ वा. – मंदिरामध्ये पालखीचे आगमन
- देवतानां सोनेरूपी शमीपत्रे अर्पण करून इष्टमित्रांना सोने भेटविणे व उत्सवाची सांगता
श्रीरामवरदायिनी मातेचा उत्सव – भक्तांसाठी आवाहन
श्रीरामवरदायिनी माता ही भक्तांच्या श्रद्धेचे व आस्थेचे प्रमुख दैवत आहे. नवरात्रोत्सवाच्या या पवित्र पर्वात देवीच्या विविध धार्मिक विधी, आरती, अभिषेक, महाप्रसाद आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा भक्तांनी लाभ घ्यावा.
सर्व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्रीरामवरदायिनी मातेचे दर्शन घ्यावे व मातेचा आशीर्वाद प्राप्त करावा.
|| श्रीरामवरदायिनी माता प्रसन्न ||