द्रौपदीस तहान लागल्यावर भीमाने जमीन फोडून पाणी निर्माण केले. हे टाके आजही “भीमाची कोपरखळी” किंवा “पांडवाचे टाके” म्हणून ओळखले जाते आणि पाहण्यासारखे आहे.
पांडवांनी शेजारील पर्वत फोडून मार्ग तयार केला, जो आज “पांडवदरी” या नावाने प्रसिद्ध आहे. हा मार्ग पार्वतीपूरच्या पवित्रतेला अधोरेखित करणारा आहे.
राम वनवासाच्या काळात या दंडकारण्यात आले. प्रभू राम, सीतेच्या विरहाने व्याकुळ झालेले असताना पार गावात आले. तेव्हा पार्वतीने सीतेचे रूप धारण करून त्यांची परीक्षा घेतली. रामाने तिला ओळखले आणि तीच पार्वती भवानी “श्रीरामवरदायिनी” म्हणून प्रसिध्द झाली.
श्री क्षेत्र पार्वतीपूर हे फक्त एक धार्मिक स्थळ नसून, इतिहास, अध्यात्म आणि निसर्ग यांचा अनोखा संगम आहे. येथे येऊन पांडवांच्या व रामायणातील घटनांचा साक्षात्कार घ्या आणि श्रीरामवरदायिनी मातेस वंदन करा.