श्रीरामवरदायिनी देवी मंदिर

आसपासची ऐतिहासिक ठिकाणे

पार्वतीपूर परिसरात अनेक ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळे आहेत जी भाविक आणि पर्यटकांसाठी विशेष आकर्षण ठरतात:

शिव मंदिर

गावातील प्राचीन शिवमंदिर हे स्थानिकांची श्रद्धास्थान आहे. शिवकालीन वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना असलेले हे मंदिर भाविकांना शांततेचा अनुभव देते.

प्रतापगडावरील भवानी मंदिर

छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या ठिकाणी भवानी मातेचे दर्शन घेतले आणि तलवार प्राप्त केली, ते प्रसिद्ध प्रतापगडावरील भवानी मंदिर फक्त काही किलोमीटर अंतरावर आहे. ऐतिहासिक दृष्ट्या हे स्थान अत्यंत महत्वाचे आहे.

मेटावरील देवीचे मूळ स्थान

गावालगतच्या मेटा (उंचवट्यावर) असलेले आदिमायाचे मूळ स्थान — येथे पार्वतीमातेची पहिली मूळ स्थापना झाल्याचे मानले जाते. या स्थळाला धार्मिक आणि आध्यात्मिक महत्व आहे.

शिवकालीन पूल

गावात एक जुना शिवकालीन पूल आहे जो त्या काळातील स्थापत्यकलेचे अद्भुत उदाहरण आहे. आजही मजबूत स्थितीत असून, इतिहासाची साक्ष देणारा हा पूल पर्यटकांचे लक्ष वेधून घेतो.
Scroll to Top