आपली श्रद्धा, आपली सेवा
श्रीरामवरदायिनी देवीच्या पवित्र मंदिराच्या देखभाल, सुशोभीकरण व धार्मिक उपक्रम राबविण्यासाठी आपली देणगी ही एक अमूल्य साथ आहे. आपल्या कृपावंत हातून दिलेली देणगी मंदिराच्या सेवाकार्यात उपयोगी पडते आणि देवीच्या कृपेस पात्र होते.
देणगीचे प्रकार
नित्यपूजा व अभिषेक देणगी
देवीच्या दररोजच्या पूजेसाठी.
अभिषेक, फुलं, नैवेद्य, दीप, व आरती साहित्यासाठी.
यात्रोत्सव देणगी
वार्षिक यात्रोत्सवामध्ये वापरण्यात येणाऱ्या कार्यक्रमांसाठी.
मिरवणुका, छबिना, महाप्रसाद, सांस्कृतिक कार्यक्रम इ.
विकास व सुशोभीकरण निधी
मंदिर परिसरातील स्वच्छता, सुविधा व सौंदर्यीकरणासाठी.
नविन बांधकाम, मूर्ती दुरुस्ती, रस्ता सुधारणा इ.
अन्नदान / महाप्रसाद निधी
यात्रोत्सव व विशेष दिवशी भाविकांना अन्नदानासाठी.
नवसपूर्ती / नामस्मरण देणगी
नवस फेडण्यासाठी किंवा विशेष सेवा / कार्यक्रमासाठी देणगी.
देणगी कशी द्यावी?
-
ऑनलाईन देणगी (लवकरच उपलब्ध)
-
देवस्थानला प्रत्यक्ष भेट देऊन पावतीसह रोख रक्कम / चेक स्वरूपात.
महत्त्वाच्या सूचना
देणगी नेहमी पावती घेऊनच द्यावी.
नाव, संपूर्ण पत्ता आणि मोबाईल नंबर देवस्थानच्या रजिस्टरमध्ये नोंदवावे.
विशेष बांधकाम, सेवा वा नवसासाठी ट्रस्टची पूर्व परवानगी आवश्यक आहे.