श्रीरामवरदायिनी देवी मंदिर

मंदिर नियम व अटी

देवदर्शन व पूजन संबंधित नियम

  • येण्याअगोदर सूचना
    शक्य असल्यास मंदिरात येण्याआधी पत्राद्वारे किंवा फोनवरून सूचना देणे.

  • अभिषेकासाठी तयारी
    पूजा सुरू होण्यापूर्वी अभिषेकासाठी तयार राहावे.

  • नैवेद्य संबंधित सूचना
    देवीसाठी नैवेद्य स्थानिकच आणावा. परगावाहून नैवेद्य आणू नये.

  • गाभाऱ्यातील शिस्त
    गाभाऱ्यात अंगात येणे, घुमणे, ध्वनी करणे यांसारख्या कृती टाळाव्यात.

मंदिर परिसराचे नियम

  • स्वच्छता आणि शांतता राखा
    मंदिर परिसरात स्वच्छता व शांतता राखावी.

  • संपर्क आणि सहकार्य
    आवश्यक असल्यास पूजारी किंवा ग्रामस्थांशी संपर्क साधावा.

नवस, देणगी व बांधकाम नियम

  • नवसाची नोंदणी
    नवस केल्यास देवस्थानच्या रजिस्टरमध्ये संपूर्ण पत्त्यासह नोंद करावी.

  • देणगी व्यवहार
    देणगी पावती घेऊनच देणगी द्यावी.

  • विशेष विधींसाठी परवानगी
    मोठे धार्मिक विधी, पूजन, वा कार्यक्रम आयोजित करायचे असल्यास देवस्थान ट्रस्टची पूर्व परवानगी आवश्यक.

  • बांधकाम / सुशोभीकरणासाठी परवानगी
    नवसाच्या फेडीकरिता वा स्वतःच्या इच्छेने कोणतेही बांधकाम / सौंदर्यीकरण करायचे असल्यास, ट्रस्टची पूर्व परवानगी आवश्यक आहे.

Scroll to Top