गावातील प्राचीन शिवमंदिर हे स्थानिकांची श्रद्धास्थान आहे. शिवकालीन वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना असलेले हे मंदिर भाविकांना शांततेचा अनुभव देते.
छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या ठिकाणी भवानी मातेचे दर्शन घेतले आणि तलवार प्राप्त केली, ते प्रसिद्ध प्रतापगडावरील भवानी मंदिर फक्त काही किलोमीटर अंतरावर आहे. ऐतिहासिक दृष्ट्या हे स्थान अत्यंत महत्वाचे आहे.
गावालगतच्या मेटा (उंचवट्यावर) असलेले आदिमायाचे मूळ स्थान — येथे पार्वतीमातेची पहिली मूळ स्थापना झाल्याचे मानले जाते. या स्थळाला धार्मिक आणि आध्यात्मिक महत्व आहे.
गावात एक जुना शिवकालीन पूल आहे जो त्या काळातील स्थापत्यकलेचे अद्भुत उदाहरण आहे. आजही मजबूत स्थितीत असून, इतिहासाची साक्ष देणारा हा पूल पर्यटकांचे लक्ष वेधून घेतो.