स्वच्छता आणि शांतता राखा मंदिर परिसरात स्वच्छता व शांतता राखावी.
संपर्क आणि सहकार्य आवश्यक असल्यास पूजारी किंवा ग्रामस्थांशी संपर्क साधावा.
नवस, देणगी व बांधकाम नियम
नवसाची नोंदणी नवस केल्यास देवस्थानच्या रजिस्टरमध्ये संपूर्ण पत्त्यासह नोंद करावी.
देणगी व्यवहार देणगी पावती घेऊनच देणगी द्यावी.
विशेष विधींसाठी परवानगी मोठे धार्मिक विधी, पूजन, वा कार्यक्रम आयोजित करायचे असल्यास देवस्थान ट्रस्टची पूर्व परवानगी आवश्यक.
बांधकाम / सुशोभीकरणासाठी परवानगी नवसाच्या फेडीकरिता वा स्वतःच्या इच्छेने कोणतेही बांधकाम / सौंदर्यीकरण करायचे असल्यास, ट्रस्टची पूर्व परवानगी आवश्यक आहे.